Hadapsar- धारदार शस्राने वार करून 17 वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून; आरोपी अजूनही मोकाट

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका 17 वर्षाच्या मुलाचा धारदार शस्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी (दि.28) रात्री आठ च्या सुमारास मांजरी बुद्रुक मधील मांजराईनगर येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

तुषार भापकर (वय 17, रा. वेताळवाडी, मांजरी बुद्रुक) असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.याप्रकरणी सारीका भापकर (वय 35, रा. वेताळवाडी, मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.याप्रकरणी मांजराईनगर येथे राहणारे सनी शिनगारे(वय 20), विनोद शिनगारे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सारीका भापकर यांचा 17 वर्षांचा मुलगा तुषार याचे सकाळी 11 च्या सुमारास काही मुलांसोबत भांडण झाले होते. परंतु झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच रात्री त्या तरूणांनी मिळून तुषारच्या डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्रांनी वार केले. यामध्ये तुषार गंभीररित्या जखमी झाला आणि त्यातच त्याचा दूर्दैवी मृत्यू झाला.याप्रकरणी कोणालाही अटक केली नसून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.