Maharashtra Corona Update : राज्यात 7,811 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण  

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 893 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 1,761 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या 7,811 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 64 हजार 516 एवढी झाली आहे. आजवर 77 लाख 09 हजार 015 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.02 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात शनिवारी 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 695 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

आजवर 7 कोटी 77 लाख 44 हजार 579 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 743 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1,40,942 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.