Pimpri : आमदार महेश लांडगे यांचे मोशीतील ज्येष्ठप्रती ऋण; ज्येष्ठ नागरिकांचा गौरव  

'सन्मान ज्येष्ठांचा, मोशीच्या अभिमानाचा'

एमपीसी न्यूज – आमदार महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि मंगेश हिंगणे यांच्यातर्फे ‘सन्मान ज्येष्ठांचा’ या उपक्रमाअंतर्गत मोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. मोशीच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजाविणा-या विविध क्षेत्रातील 44 जणांचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मोशीत गुरुवारी (दि.26) झालेल्या या गौरव सोहळ्याला माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका सारिका बो-हाडे, सुवर्णा बुर्डे, सामाजिक कार्यकर्ते अजित बुर्डे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशनतर्फे गावाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजाविणा-या, गावातील नागरिकांना तरुणांना योग्य दिशा देणा-या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा सुरु करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मोशीतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “मोशीच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचा सन्मान केला जात आहे. या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मोशी, च-होली परिसरातील अनेक तरुण घडले आहेत. ते आज चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत. राजकारणात देखील मोठ्या उंचीवर पोहचली आहेत. आपण देखील त्यांच्या मार्गदर्शनामुळेच घडलो आहोत. त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच वाटचाल सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली समाविष्ट गावाचा विकास सुरु आहे”

“समाविष्ट गावांचा महापालिकेत समावेश होऊन 20 वर्ष होऊन गेली. तरी, देखील गावांचा विकास झाला नव्हता. 2014 पासून महेशदादा आमदार झाल्यापासून ख-या अर्थाने समाविष्ट गावाला विकास म्हणजे काय असतो, हे समजत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून समाविष्ट गावात विकासाची गंगा वाहिली आहे. त्यांच्यामुळेच समाविष्ट गावातील एकाला नव्हे तर दोघांना शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला” असेही महापौर जाधव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.