Pune – दूचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेले महिलेच्या गळ्यातील 50 हजाराचे गंठण

एमपीसी न्यूज – दूचाकीवरील चोरट्याने रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील 50 हजाराचे गंठण हिसकावून नेल्याची घटना काल गुरूवारी (दि.29) सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान हडपसर येथील प्रभात कॉलनी तुकाई दर्शन येथे घडली.

याप्रकरणी फुरसुंगी येथे राहणा-या एका 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काल सायंकाळी भाजी घेऊन रस्त्याने पायी घरी निघाल्या होत्या. त्यावेळी दूचाकीवर एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि त्याने फिर्यादीच्या गळ्यातील 50 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले
याप्रकरणी दूचाकीवरील अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.