पिंपरी चिंचवड :रहाटणीत क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांची पुण्यतिथी आणि संविधान जागर सप्ताह साजरा

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रहाटणी मध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने संविधान जागर सप्ताह घेण्यात आला. यावेळी श्री शिव छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच महापुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

यावेळी नगर सेविका निर्मलाताई कुटे (नगर सेविका), भारिपचे पी. सी. एम. सी.चे शहराध्यक्ष, इंजिनिअर देवेद्र तायडेसाहेब, मावळचे अध्यक्ष, माउली सोनावणे,समस्त गावकरी मंडळ रहाटणीनीचे अध्यक्ष देवाअप्पा नाखाते,  रमेश नखाते, आबासाहेब पांढरे, विशाल जाधव, कल्पना हालू (महिला अध्यक्ष), विजय जगताप, भगवान गोडांबे, बी. एस.  कांबळे (प्रसिद्ध लेखक) श्री. युवराज प्रगणे (सामाजिक कार्यकते), श्री. सुरेश भालेराव (मा. पोलीस निरीक्षक)  संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार उपस्थित होते.

देवेद्र तायडेसाहेब यांनी संविधाना तील घटनेविषयी सखोल मार्गदर्शन केले.  संविधानाचे पालन आणि रक्षण करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. आर्दश लोकशाहीचा राज मार्ग संविधानात दडलेला आहे. त्यामुळे जनतेला संविधान खूप महत्वाचे आहे. अश्या प्रकारे संविधानाची माहिती सांगून सर्वमान्यवरांना संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या. राष्ट्रपिता यांच्या जयंती निमित्त फुल्यांच्या कार्याचा वसा घेतलेल्या समाज प्रभोधनकार शारदाताई मुंडे यांचा “मी सावित्रीबाई बोलते” हा एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला.  तसेच  ह्यावेळी रहाटणीतील जेष्ठ नागरिक आर. डी. भालेराव यांनी लिहिलेले आत्मचरित्र “माझे इंदू सदन” या पुस्तिकेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट 26/11 च्या शहीद जवाणांना श्रध्दाजंली  वाहून करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम भालेराव, गोरख रोकडे व आभार तात्या शिनगारे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.