Pune : आयपीएचतर्फे सोमवारी ‘माध्यान्ह’ ज्येष्ठ नागरिक कुटुंबीय स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच)यांच्या वतीने सोमवारी (दि.3) ‘माध्यान्ह’ ज्येष्ठ नागरिक कुटुंबीय स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘माध्यान्ह’ ज्येष्ठ नागरिक कुटुंबीय स्वमदत गटाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या स्वमदत गटामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांच्या अनुभवांचे आदानप्रदान व समस्यापूर्तीवर या विषयावर चर्चा केली जाणार आहे. या गटातला सहभाग विनामूल्य आहे.

हा कार्यक्रम इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक 4, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.