Pune – कारचालकाच्या चूकीमुळे दूचाकीवरील जेष्ठाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – कारमधून खाली उतरताना पाठीमागे न पाहता दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वाराची कारच्या दरवाज्याला झालेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.28) दूपारी दोनच्या सूमारास औंध येथील डी.पी. रोडवर घडली . विश्वास व्यंकटेश लांडगे (वय 62, रा. बालेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र तुपसौंदर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील डी.पी.रोडवर एका कारचालकाने नो पार्कींगच्या जागेमध्ये आपली कार उभी केली होती. आणि त्या इसमाने कारमधून खाली उतरताना मागे न पाहता कारचा दरवाजा अचानक उघडला. दरम्यान पाठीमागून दुचाकीवर येणारे विश्वास लांडगे हे कारच्या दरवाजाला धडकले आणि रस्त्यावर खाली पडले. या अपघातात विश्वास यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:श्रुंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.