Sangvi : बनावट सहीच्या आधारे भागीदाराची नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – धनादेशावर भागीदाराची बनावट सही करून नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.

चिराग पुरुषोत्तम राठोड (वय 45, रा. मातोश्री पार्क, साठ फुटी रोड, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गिरिधर गोविंद परमार (वय 60, रा. गंगोत्री नगर, नावेचा रोड, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड आणि परमार यांची भागीदारीत ए. पी. कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे. 12 सप्टेंबर रोजी परमार यांनी राठोड यांच्याजवळील एक धनादेश घेतला. त्यावर नऊ लाख रुपयांचा आकडा टाकून बनावट स्वाक्षरी केली. हा धनादेश त्यांनी महेंद्र कोटक बॅंकेच्या औंध शाखेतील बचत खात्यावर भरून फसवणूक केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.