Wakad : थेरगावात घरफोडी करत दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना कैलासनगर थेरगाव येथे शनिवारी (दि.1) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.

रेश्‍मा (वय 40, रा. मोहटा देवी मंदिराजवळ, कैलासनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत फिर्यादी रेश्‍मा या घराला कुलूप लावून काळेवाडी येथील आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने, देव्हाऱ्यातील मूर्तीच्या कानातील सोन्याचे झुबे आणि प्लास्टिकच्या गल्ल्यातील रोख 30 हजार रुपये, असा एक लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.