Pimple Saudagar : कच-यापासुन खत निर्मितीचा कुणाल आयकाँन सोसायटीचा उपक्रम

एमपीसी  न्यूज – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकाँन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कच-यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते.या उपक्रमाचे उदघाटन नगरसेवक विठ्ठल ( नाना) काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रकल्पाची माहिती देताना सोसायटीचे विनोद सुर्वे म्हणाले. कुणाल  आयकॉन सोसायटीतील एकुण टन  ओला व सुका कचरा संकलित केला जातो.ओला व सुका कच-याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँट मधे संकलित करण्यात येतो.सुरूवातीला सोसायटीच्या   एकाच विभागात हे  काम सुरू करण्यात आले होते ते आता सोसायटीच्या दोन भागात सुरू करण्यात आले आहे.एकुण एक टन ओल्या व सुक्या कच-यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देतआहेत. यात संकलिक  झालेला कचरा प्लँट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे.जागेवरच ओला व सुका कच-याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडुन करण्यात आला आहे.यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा,आणी आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा,घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो.येथील कच-यापासुन खत निर्मिती या उपक्रमाची आयआयटी संस्थेकडुनही भेट देवुन दखल घेण्यात आली आहे. तीन महिन्यात संकलिक कच-याची पहिली खेप (बँच) निघणार आहे.सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे,उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी प्रभाकर तावरे,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सोसायटीचे विनोद सुर्वे,चंद्रशेखर सोनपोठकर,मकरंद गुर्जर,प्रविण ढमाले,नटराज श्रिनिवासन,जॉन डिसुझा आदी सोसायटीतील रहिवाशी नागरिक सहकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.