Hinjawadi : व्यावसायिक कारणावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – व्यावसायिक कारणावरून झालेल्या भांडणात दोन जणांना मारहाण करण्यात आली. ही घटना मारूंजी येथे शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी घडली.

निसार गौस सौदागर (वय 57, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रावण पाटील आणि त्याचा मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूंजीतील बुचडे वस्ती येथील एस क्‍लासिक स्टील मॅन्युफॅक्‍चर कंपनीमध्ये फिर्यादी निसार आणि त्यांच्या कंपनीचे मालक मकरंद दत्तात्रय कुलकर्णी हे मोल्डडाय मशीन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी श्रावण पाटील आणि मकरंद कुलकर्णी यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. यामध्ये निसार आणि मकरंद कुलकर्णी यांना मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.