BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : बीआरटीच्या थांब्यावर उभारणार पाणपोई आणि स्वच्छतागृह

71
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या बीआरटीच्या थांब्यांवर सुलभ स्वच्छतागृह आणि पाणपोईची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच  शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेतर्फे नाशिक फाटा ते वाकड, औंध ते रावेत आणि दापोडी ते निगडी हे 3 रेनबो बीआरटीएस मार्ग विकसित करण्यात आले आहेत. त्यावर पीएमपीएलच्या वतीने बस सेवा सुरू आहे. तर, काळेवाडी फाटा ते चिखलीचा देहू-आळंदी रस्ता आणि बोपखेल फाटा ते आळंदी रस्ता हा बीआरटी मार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे.

बीआरटी थांब्यावर सुलभ स्वच्छतागृह आणि पाणपोईची सुविधा विकसित केली जाणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.