Pune : चाकूचा धाक दाखवून ऊबेर चालकाची केली लूट

एमपीसी न्यूज – चाकूचा धाक दाखवून कारमधून आलेल्या चौघांनी ऊबेर चालकाच्या ताब्यातील कार आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.2) पहाटे अडीचच्या सुमारास सुतारवाडी येथील जयभवानी नगर येथे घडली.

याप्रकरणी विष्णू सपकाळ (वय 45, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णू सपकाळ हे ऊबेर कंपनीमध्ये चालक म्हणून कामास असून ते रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान सुतारवाडी येथील जयभवानीनगर येथे ग्राहकाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी तिथे कारमधून चार अनोळखी इसम फिर्यादीजवळ आले. त्यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवुन त्यांना कारमधून खाली उतरवले. त्यानंतर चौघांनी मिळून सपकाळ यांची मारूती स्विफ्ट डिझायर आणि मोबाईल फोन असा एकूण 5 लाख 10 हजार रूपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

याप्रकरणी चार अज्ञात इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.