Sangvi : टेरेसवरील डिशच्या बारला गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – इमारतीच्या टेरेसवर लावलेल्या डिशच्या बारला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

दीपक लक्ष्मण कुचेकर (वय 38, रा. गायत्री कुंज सोसायटी, कृष्ण राज कॉलनी, पिंपळे गुरव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक यांनी रविवारी सायंकाळी दोनच्या सुमारास ते राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर लावलेल्या डिशच्या बारला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.