Pimple Saudagar : सुवर्ण महोत्सव काकड आरती कीर्तन सप्ताह साजरा

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सव काकड आरती कीर्तन सप्ताह व गाथा भजन सोहळ्याचे दि. 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

आठ दिवस चाललेल्या या सप्ताहमध्ये रोज पहाटे साडेचार ते साडेसहा काकडा, सकाळी 9 ते 12 गाथा भजन, दुपारी 1 ते 5 महिला भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व सायं. 7 ते 9 हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवार दि.२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हभप.जनक महाराज सोळंके, रविवारी हभप.महंत प्रमोद महाराज जगताप, सोमवार हभप.संदीपान महाराज शिंदे, मंगळवार हभप.भारत महाराज जोगी, बुधवार हभप.केशव महाराज उखळीकर, गुरुवार हभप.उद्धव महाराज मंडलिक, शुक्रवार हभप.जगन्नाथ महाराज पाटील इत्यादी महाराजांचे सुश्राव्य कीर्तन झाले.

गुरुवार दि. 29 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 7 ते 9 हभप.उध्दव महाराज मंडलिक यांचे किर्तन झाले. याप्रसंगी हभप.उद्धव महाराज मंडलिक यांनी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांचा सन्मान केला. दि.30 डिसेंबर 18 रोजी सायंकाळी 7 ते 9 मुंबईचे वाणीभूषण हभप. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी हभप.जगन्नाथ महाराज पाटील यांनी नगरसेविका शीतल नाना काटे यांचा सन्मान केला. तसेच दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 रामायणाचार्य हभप. रामरावजी महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन झालेल्या सप्ताहामध्ये विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन झाले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे व विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे अध्यक्ष संदेश काटे पाटील यांच्या हस्ते महाराजांना सन्मानित करण्यात आले. काल्याच्या कीर्तनास प्रामुख्याने हभप चंद्रकांत महाराज वांजळे,  हभप.संतोष महाराज पायगुडे, हभप.पुरुषोत्तम महाराज पाटील उपस्थित होते त्यांचाही सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल हभप. खंडूजी झिंजुर्डे, हभप. रघुनाथ काटे, हभप. पंडित काटे, हभप. आनंदा काटे, हभप. शेखर सुखदेव काटे, हभप. विलास बाबुराव काटे, हभप. रामचंद्र महादू भिसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.

सुवर्ण महोत्सव काकड आरती कीर्तन सप्ताहाचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.