BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गोवर अणि रुबेलाची लस टोचल्यामुळे 8 वर्षाच्या मुलीला पॅरॅलिसिस ?

पालकांचे आरोप ससूनचे अधिष्ठाता चंदनवाले यांनी फेटाळले.

1,727
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – गोवर अणि रुबेलाची लस दिल्यामुळे हडपसर येथील महापालिकेच्या शाळेतील 8 वर्षाच्या मुलीला पॅरॅलिसिस झाला आहे असे आरोप कुटुंबीयां कडून करण्यात आला आहे. या लसीमुळे पॅरॅलिसिस झाल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच पुणे शहरात एकच खळबळ उडाली. तर ससूनचे अधिष्ठाता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

श्वेता संतोष कांबळे वय 8 राहणार हडपसर असे मुलीचे नाव आहे.

” रूबेला लसीचा परिणाम झाला नाही ” – ( अजय चंदनवाले ,ससूनचे अधिष्ठाता )

या प्रकरणी ससूनचे अधिष्ठाता अजय चंदनवाले म्हणाले की, रूबेला लसीचा परिणाम झाला नसून , ग्यूलेन बारी सिंड्रोम आणि मेंदू संबंधित आजार निर्माण झाला आहे. त्यामुळे पॅरॅलिसिस या आजाराची लक्षणे आहेत. हे लक्षात घेता मुलीवर उपचार सुरू असून या मुलीचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3