Pune – महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या पतीनेच पत्नीचा खून करून केली आत्महत्या

11 वर्षांचा चिमुरडा अनाथ

एमपीसी न्यूज – पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहणा-या दांम्पत्यामध्ये महाबळेश्वरमध्ये फिरायला गेल्यानंतर झालेल्या वादामध्ये पतीने पत्नीचा खून केला. आणि त्यानंतर चाकूने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.
अनिल शिंदे आणि सीमा शिंदे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिंदे दाम्पत्य आपल्या 11 वर्षाचा मुलगा आदित्य याच्यासह काल बुधवारी महाबळेश्वरला फिरायला गेले होते. महाबळेश्वरला गेल्यानंतर तेथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यानंतर रात्री अनिल आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाले. त्यांच्यातील वाद एवढा प्रचंड वाढला, की त्यादरम्यान अनिलने त्याच्या पत्नीचा रागाच्या भरात चाकूने वार करून खून केला. एवढेच नाही तर अनिलने त्यानंतर स्वत:चा देखील गळा चाकूने चिरला आणि पत्नीसोबतच स्वत:ची जीवनयात्रा संपवली. हा सर्व धक्कादायक प्रकार त्यांच्या 11 वर्षाच्य़ा चिमुरड्याने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला. या घटनेने तो प्रचंड घाबरला होता. तशाच अवस्थेत तो खोलीच्या बाहेर पडला आणि त्याने घडलेला प्रकार हॉटेलमधील कर्मचा-याला सांगितला. त्यानंतर सर्वांनी रूममध्ये धाव घेतली आणि याची माहिती पोलिसांना दिली. दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून याप्रकरणी पुढीस तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.