Sangvi : विद्यार्थ्यांनी घेतली विज्ञानावर आधारित प्रयोगांची माहिती

एमपीसी न्यूज – सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चिंचवडमधील सायन्स पार्कला भेट देऊन विज्ञानावर आधारित विविध वस्तू आणि प्रयोगांचा आनंद लुटला

सोसायटी तर्फे शैक्षणिक सहली अंतर्गत यामध्ये 8 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदींसह शिक्षकवृंद आदी यावेळी उपस्थित होते.

सायन्स पार्कला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांना विज्ञानाचा आविष्कार पाहायला मिळाला. पार्कमध्ये ठेवलेल्या विमानासमवेत सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवरता आला नाही. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने सायन्स पार्कमधील वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती घेतली. तारांगण, विज्ञान फिल्म व थ्रीडी शो पाहिला. यामध्ये मुलांना नवनवीन प्रयोग शिकण्यास मिळाले. यामुळे मुलांचा शैक्षणिकदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळाली. तसेच, शालेय अभ्यासक्रमातील विज्ञानविषयक शंकाही विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. प्रत्यक्ष विज्ञान काय आहे, या वैज्ञानिक घडामोडी कशा घडतात, त्यामागच्या गमतीजमती याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.

आरती राव यांनी सांगितले, की शैक्षणिक सहलीत विद्यार्थी जेव्हा विज्ञानावर आधारित प्रयोग बघतात, तेव्हा त्यांच्या मनात कुतूहल आणि जिज्ञासा जागृत होते आणि यातूनच एखादा वैज्ञानिक तयार होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.