BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पालिका शाळांमध्ये ‘उन्नती’ प्रकल्प

96
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याकरिता ‘उन्नती’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या आज (गुरुवारी) झालेल्या सभेत आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केला आहे. शाळांची पाहणी करत विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात यासंदर्भात  शाळांचा सर्व्हे झाला होता. त्यानंतर जे विद्यार्थी अजूनही अभ्यासात मागे आहेत अशा विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्याचे शिक्षकांना सांगण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा शाळांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.

कोणताही विद्यार्थी अप्रगत राहू नये सर्व विद्यार्थी प्रगत व्हावे याकडे लक्ष देण्याचे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार डिसेंबरपर्यंत शिक्षकांना मुदत देण्यात आलेली आहे. त्यांतरही विद्यार्थी अप्रगत असतील तर मात्र अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीसा देण्यात येणार आहेत. दिलेल्या मुदतीनंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी गुणवत्ता तपासणी टीम तयार केली जाणार आहे. या टीममध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश करत त्यांनाही या गुणवत्ता वाढ प्रक्रीयेत सहभागी करुन घेतले जाणा आहे. त्याचबरोबर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्य सेवा व विमा काढण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत उपचार मिळणार आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3