Bhosari : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल कलासागर जवळ कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोमल मगन तलरेजा (वय 27, रा. औदुंबर सोसायटी, पिंपरी गाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मगन चिनकुमल तलरेजा (वय 56) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास मयत मगन त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / डी डब्ल्यू 1572) खडकी येथे कामावर जात होते. ते कासारवाडी येथे हॉटेल कलासागरच्या जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये मगन गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून निघून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.