Pimpri: पावणे दोन लाख बालकांनी घेतला गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीचा लाभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक लाख 61 हजार 475 बालकांनी गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, या लसीकरणा दरम्यान दोन बालकांना किरकोळ त्रास झाला होता. त्यांच्यावर तातडीने उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीमध्ये 6 डिसेंबर 2018 अखेर 448 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्याअंतर्गत शहरातील एक लाख 61 हजार 475 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरण मोहीमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खाजगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.