Sangvi : घटस्फोट मागत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेने पैसे आणण्यासाठी नकार दिल्याने तिच्याकडे घटस्फोट मागत छळ केला. ही घटना जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती असीम अन्वर शेख (वय 28) आणि सासू सायरा अन्वर शेख (वय 45) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आरोपी असीम याच्यासोबत जुलै 2017 मध्ये विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादी महिलेच्या माहेरच्या लोकांनी लग्नात काहीही दिले नाही. त्यामुळे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासूने ‘तू माझ्या मुलाला घटस्फोट दे, मी त्याचे दुसरे लग्न लावणार आहे.’ अशी धमकी दिली. यावरून विवाहितेने गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.