Pimple Gurav : आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

एमपीसी न्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीच्या काळात नागरिकांनी कोणत्या प्रकारची खबरदारी घेऊन आपत्ती व्यवस्थापन कशाप्रकारे करावे,याबाबतची माहिती एनडीआरएफचे डीजी संजय कुमार यांनी दिली.

कोणतीही आपत्ती सांगून येत नसल्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सक्षम असले पाहिजे. आपत्तीच्या काळात तसेच जपानमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी आणि नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाच्या काळात एनडीआरएफच्या चमूने कशाप्रकारे मदत केली, याबाबतची माहिती या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

भूकंप, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, क्लोरिन वायुगळती, ज्वालामुखीचा उद्रेक या आपत्तीच्या काळात मदत व बचाव करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजावावी लागत असल्याचे एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. पूर परिस्थितीच्या काळात पूर येण्यापूर्वी बचाव कार्य करण्यात येते. याबाबतची चित्रफीत यावेळी देखील दाखविण्यात आली.

पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात एकत्रित भूकंप आपत्ती व्यवस्थापन  ही दोन दिवसीय कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन डीएम युनिटचे संचालक दौलत देसाई, एडीजी एसआरपीएफच्या अर्चना त्यागी, एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  पिंपरी-चिंचवड अग्निशामक अधिकारी किरण गावडे, एनडीआरएफचे (धुळे) सचिन गोरे, आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक ओमप्रकाश बहिवाल, यशदाचे आपत्ती व्यवस्थापक संचालक कर्नल विश्वास सुपनेकर, पुण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोते, पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुणे, बाबा भोईऱ, संतोष शेलार आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.