Dighi: दिघीत पाणीपुरवठा विस्कळीत; नगरसेवक डोळस यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर 

एमपीसी न्यूज – गेल्या दिड महिन्यांपासून दिघी, बोपखेल परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिला, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरसेवक विकास डोळस यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विस्कळीत पाणी पुरवठा होत असलेल्या भागात समक्ष पाहणी केली.   

यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे उपस्थित होते.  नगरसेवक डोळस म्हणाले, गेल्या दिड महिन्यांपासून दिघी, बोपखेल भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे महिला, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  शहराच्या इतर भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत असताना दिघी परिसरात वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.

यामुळे सोमवारी सकाळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेचा ठेकेदार यांना सोबत घेऊन विस्कळीत पाणी पुरवठा होणाऱ्या भागाची पाहणी केली. या भागाचा पाणी प्रश्न पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी नगरसेवक विकास डोळस यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.