Pune : ‘सीए’ सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रतिनिधी – प्रमोदकुमार गुप्ता

'आयसीएआय'तर्फे प्राप्तिकरांतील तरतुदींवर कार्यशाळा  

एमपीसी न्यूज – “प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,” असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.

दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘सेवाभावी आणि धार्मिक संस्थांसाठीच्या प्राप्तिकरातील तरतुदीं’ यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजिली होती. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनात झालेल्या कार्यशाळेवेळी पुण्यातील प्राप्तिकर विभागाचे आयुक्त एस. एस. मीना, अतिरिक्त आयुक्त संदीप साळुंखे, अभिषेक मेश्राम, नरेंद्र काणे, सीए शशांक पत्की, आयसीएआयच्या उपाध्यक्षा सीए ऋता चितळे, जगदीश धोंडगे, अभिषेक धामणे यांची प्रमुख उपस्थिती होती. १९० पेक्षा जास्त सीए या कार्यशाळेत सहभागी झाले.

_MPC_DIR_MPU_II

प्रमोदकुमार गुप्ता म्हणाले, “करदाते, सीए आणि कर विभागातील अधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून चांगले वातावरण ठेवले पाहिजे. सेवाभावी संस्थांनी कर भरताना तरतुदी अभ्यासाव्यात व त्यानुसार आपल्या खर्चाचा ताळेबंद करावा. त्यासाठी सीए मंडळींनी मार्गदर्शन करावे.”

शशांक पत्की, एस. एस. मीना यांनीही या विषयावर मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अभिषेक धामणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.