Kasarwadi : कासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – दत्तजयंती निमित्त कासारवाडी येथील दत्त साई सेवा कुंज आश्रम (मंदिर) येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. 14 डिसेंबरपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे शिबिर चालू असणार आहे.

शिबिराच्या उदघाटनप्रसंगी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी आमदार विलास लांडे, उद्योजक विजयशेठ जगताप, माऊली जगताप, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, आदिती निकम, नगरसेवक हर्षल ढोरे, शशिकांत कदम, सागर आंघोळकर, उषा मुंडे, अंबरनाथ कांबळे, सुनील येडे, डॉ. देविदास शेलार, संजय मराठे, गणेश सोनवणे, ज्ञानेश्वर खैरे, मारुती कवडे, सुरेश शिंदे, भाऊ कानकात्रे आदी उपस्थित होते.

या महाआरोग्य शिबिरात आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, लायन्स क्लब ऑफ पुणे आर्य या रुग्णालयांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून कर्करोग, अस्थिरोग, नेत्र तपासणी, नाक, कान, घसा, शुगर, रक्तदाब, इसीजी, गर्भाशय कर्करोग, हिमोग्लोबिन तपासणी इतर शस्त्रक्रिया तसेच मोफत उपचार व माहीती देण्यात येणार आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ६२१ मोफत चष्मे वाटप करण्यात आले. एक हजार २७६ गरजू नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे आश्रमात २३ डिसेंबरपर्यंत कीर्तन महोत्सव सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.