Pimpri : ओल्या कच-यावर प्रक्रिया करून खत निर्मिती

वसंत अव्हेन्यू सोसायटीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील वसंत अव्हेन्यू  सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओल्या कच-यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.साधारण एक हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला  कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या उपक्रमाचे उदघाटन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सोसायटीचे चेअरमन राहुल घरटे,सेक्रेटरी अतुल रीचारीया,निधी बाबर,राजू पानसरे,आदित्य विग,राजेंद्र जठार,विकास जंगले,दिनेश पाटील आदी सोसायटीतील रहिवाशी नागरिक सहकारी उपस्थित होते.

या प्रकल्पाची माहिती देताना सोसायटीचे अध्यक्ष राहुल घरटे म्हणाले, वसंत अव्हेन्यू सोसायटीत एकूण २५० सदनिका आहेत. या सोसायटीत दररोज एकुण एक टन  ओला कचरा संकलित केला जातो. ओला व सुका कच-याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँट मधे संकलित करण्यात येतो. सध्या सोसायटीच्या   एकाच विभागात हे  काम सुरू करण्यात आले आहे एकुण एक टन ओल्या व सुक्या कच-यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे. सोसायटीतील सर्व नागरिक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित  झालेला कचरा प्लँट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे.जागेवरच ओला व सुका कच-याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडुन करण्यात आला आहे.यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा,आणी आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.सोसायटी परिसर व  उद्यानातील पडणारा पालापाचोळा,घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. तीन महिन्यात संकलिक कच-याची पहिली खेप (बँच) निघणार आहे.सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे,उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.

नाना काटे म्हणाले, कच-यापासुन खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही.ख-या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहुन वाटते.माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.