Pimple Saudagar : शहर स्मार्ट होण्यासाठी नागरिक व त्यांचे विचार स्मार्ट होणे आवश्यक – आमदार लक्ष्मण जगताप

शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – शहर स्मार्ट होण्यासाठी नागरिक स्मार्ट होणे, त्याचे विचार स्मार्ट होणे आवश्यक आहे. महापालिकेने अनाधिकृत बांधकामे झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यापेक्षा ती होणार नाहीत ही काळजी घ्यावी. कारण वीज, रस्ते, पाणी यासारख्या इतर नागरी सुविधांवर ताण पडतो. ज्या सुविधा शहर वासियांना मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत रस्त्यावर अनाधिकृतक हातगाडीवर मी काहीह खरेदी करणा नाही, असा विचार सर्वांनी केला तर निश्चितच शहर बदलायला वेळ लागणार नाही, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे सौदागर येथे व्यक्त केले.

पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्यावतीन स्मार्ट सिटी प्रोजोक्टविषयी नगरिकांशी संवाद व सादरीकरण करण्यात आळे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शत्रुघ्न काटे, राजन पाटील, स्मार्ट सिटीचे निळंकठ पोमण, नगरसेविका निर्मला कुटे, जयनाथ काटे, स्विकृत नगरसेक संदीप नखाते, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, वसंत काटे, चंदा भिसे, सितेश अग्रवाल, अमित तलाठी आदी सोसायटीतील अध्यक्ष, नागरिक उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, आपले शहर देशपातळीवर स्मार्ट करायचे असेल तर शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्मार्ट झाले पाहिजे. पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव असा एकूण तेराशे एकरचे क्षेत्र स्मार्ट करण्यासाठी घेतले आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर देशातून लोक याठिकाणी येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे दौगार परिसर हा मुळातच स्मार्ट आहे. परंतु हे शहर देशपातळीवरकसे स्मार्ट होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आङे. एक जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घेतला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.