Pune : लीला पुनावाला फाउंडेशनकडून टूमारो टूगेदर प्रकल्पाअंतर्गत साडेआठ हजार मुलींना शिष्यवृत्ती

एमपीसी न्यूज – पुणे आणि परिसरातील साडेआठ हजार गरजू मुलींना लीला पुनावाला फाउंडेशनकडून टूमारो टूगेदर प्रकल्पाअंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे हे नववे वर्ष आहे. पुणे शहर व ग्रामीण भागातील 19 शाळांमधील 8 हजार 500 पेक्षा अधिक शालेय मुलींना सातवी पासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

टूमारो टूगेदर या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, शालेय मुलींना त्यांची फी, शाळेची दप्तर, रेनकोट, बूट, मोजे, गणवेश, पुस्तके, सायकल इत्यादी उपयोगी वस्तुंसोबत आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच या शिष्यवृतीमध्ये आर्थिक सहाय्याबरोबरच या मुलींना आरोग्य शिक्षण दिले जाते. एलपीएफ गरजू मुलींना शिष्यवृत्ती सोबतच स्वताला वेगळ्या पद्धत्तीने सिद्ध करण्याची संधी देतो. यात त्यांचे व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे देखील आयोजन करतो. जेणेकरून त्या स्वतःच्या पायांवर उभे राहू शकतील.

एलपीएफच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पुनावाला म्हणाल्या “पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी हुंड्यासाठी पैसे वाचविण्यापेक्षा ते त्यांच्या शिक्षणावर खर्च करावे. त्यामुळे त्या आपल्या कमाईच्या रुपात दर महिन्यास हुंडा घरात आणतील. यावेळी एलपीएफने ‘इन्सपीराचा’ 54वा अंक प्रकाशित केला. इन्सपीरा न्यूजलेटर आहे. जे एलपीएफचे जगभरातील समर्थक आणि शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता यांना जोडते. यात मुलींच्या प्रतिभा, प्रेरक कथा पहावयास मिळतात.

लीला पूनावाला फाउंडेशनचे कॉर्पोरेट फंडिंग पार्टनर इरविन स्टीनहॉझर म्हणाले, “भारतामध्ये शिक्षणास महत्त्व दिले जाते आणि भारतीय पालक त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देत आहेत ही अभिमानाची बाब आहे. लीला पुनावाला फाऊंडेशनशी जोडल्याचा अभिमान आहे.”

1999 सालच्या लीला फेलो आणि 13 वर्ष सिमेंस बरोबर काम करत यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या, “लीला पुनावाना फाऊंडेशनच्या पोस्ट ग्रॅज्युएट शिष्यवृत्तीद्वारे माझ्या जीवन प्रवासाला सुरुवात केली. आज येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. एलपीएफ माझ्यासाठी पावित्रमंदिरासमान आहे.”

शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनी मैथिल बोडके म्हणाली, “एलपीएफमुळे आता मी माझ्या स्वप्नांचा साकार करत पुढील शिक्षण घेऊ शकेल. पुढील 10 वर्षांसाठी अशा कुटुंबाचा हिस्सा बनने ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.