Pune News : पुणे पदवीधर मतदार संघात सकाळी दहा पर्यंत 8.52 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 8.52 टक्के मतदान झाले आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पाच जिल्ह्यात 2 लाख 91 हजार 371 पुरुष तर 1 लाख 34 हजार 854 महिला मतदार आहेत. त्याचबरोबर 32 तृतीयपंथी पदवीधर मतदार आहेत. यातील 27 हजार 709 पुरुष तर 8 हजार 604 महिला मतदारांनी पहिल्या दोन तासात (सकाळी दहा वाजेपर्यंत) मतदान केले आहे. एकूण 4 लाख 28 हजार 257 पदवीधर मतदारांपैकी 36 हजार 313 पदवीधर मतदारांनी दहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

सकाळी दहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. एकूण 8.52 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हावार झालेले मतदान –

_MPC_DIR_MPU_II

पुणे (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 89626 – 5763
महिला – 46958 – 3800
तृतीयपंथी – 27 – 0
एकूण – 136611 – 9563 (7 टक्के)

सातारा (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 39397 – 3503
महिला – 19673 – 755
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 59071 – 4258 (7.21 टक्के)

सांगली (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 57569 – 6207
महिला – 29661 – 1626
तृतीयपंथी – 3 – 0
एकूण – 87233 – 7833 (8.98 टक्के)

सोलापूर (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 42070 – 3579
महिला – 11742 – 559
तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 53813 – 4138 (7.69 टक्के)

कोल्हापूर (एकूण – 10 वाजेपर्यंत झालेले मतदान)
पुरुष – 62709 – 8657
महिला – 26820 – 1864
तृतीयपंथी – 0 – 0
एकूण – 89529 – 10521 (11.75 टक्के)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.