PCMC Corona update: नगरसेविकेसह कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण

8-family-members-including-pcmc-corporator-tested-positive-for-coronavirus. दरम्यान, महापालिकेतील एका उपअभियंत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिका मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दापोडीतील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील आठ जणांनाही बाधा झाली आहे. त्याचे रिपोर्ट आज (गुरुवारी)  रात्री उशिरा आले आहेत. कोरोनाने महापालिकेत शिरकाव केला आहे.

दरम्यान, या नगरसेविकेच्या संपर्कात आलेल्या नगरसेविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दापोडीतील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका शिक्षण समितीच्या सदस्या असलेल्या या नगरसेविका चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आहेत.

त्यांच्या माजी नगरसेवक पतीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या हायरिस्क  कॉन्टॅक्ट मध्ये आल्याने नगरसेविकेसह 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आता आले आहेत. त्यामध्ये नगरसेविकेसह कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

या नगरसेविका महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर फिरल्या होत्या. शिक्षण समितीच्या कार्यालयातही गेल्या होत्या. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या नगरसेविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता त्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिकेतील एका उपअभियंत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिका मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दापोडीतील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.