Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 8 नव्या रुग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 384

28  रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.  8 new patients added to the cantonment area today; Total number of patients 384

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, मामुर्डी, देहूरोड पोलीस कॉलनी, या परिसरात आज, शनिवारी एका दिवसात तब्बल 8 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, 28  रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. 

त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 384  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 8 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसर जास्त आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही रुग्ण आढळून येत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 384  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 53 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

119 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 74 रुग्ण उपचार घेत आहे.  आजपर्यंत हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 10  झाली आहे.

दरम्यान, 28  रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तर आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 128 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.