Pimpri : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाला आठ जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी चार वाजता प्रभाकर वाघिरे स्वामिंग टॅंकजवळ पिंपरी येथे घडली.

प्रतीक बाळू शिंदे (वय 19, रा. काळा खडक, वाकड) या तरुणाने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गौरव मंजाळ (वय 19), गजानन तावडे (वय 22), विकास कसबे (वय 19), अनिकेत बरगळ (वय 19, सर्व रा. काळेवाडी), शंतनू शिंदे (वय 19, रा. थेरगाव) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक आणि आरोपी गौरव या दोघांचे तीन महिन्यांपूर्वी दोघांच्या दुचाकीची धडक झाल्यावरून भांडण झाले होते. त्या घटनेचा राग गौरवच्या मनात होता. रविवारी दुपारी प्रतीक त्यांच्या दोन मित्रांसोबत पिंपरी येथील प्रभाकर वाघिरे स्वामिंग टॅंकवर पोहण्यासाठी गेले होते. जुन्या भांडणाचा राग मनात धरून गौरव याने त्याच्या साथीदारांना जमवून प्रतीक यांना काठ्या, कोयता आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये प्रतीक यांच्या खांद्यावर, हातावर, पोटावर, पायावर गंभीर दुखापत झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.