Pune : ओएलएक्सच्या माध्यमातून गाडी खरेदीच्या व्यवहारात 80 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्सच्या माध्यमातून गाडी खेरदीच्या व्यवहारात तरुणाची तब्बल 80 हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी स्वप्नील गायकवाड (वय 27, खडकवस्ती, पुणे) याने फिर्याद दिली आहे.

स्वप्नील याने ओएलएक्सच्या अॅपवर एमएच/12/एनटी/1666 या क्रमांकाची गाडी पसंत केली. ही गाडी खरेदी करण्यासाठी संबंधित व्यक्तीला फोन वरून संपर्क साधला. यावेळी त्या व्यक्तीने आपण मिलेट्रीमध्ये कामाला असून नागपूर येथे नेमणूक आहे, असे सांगितले. 20 हजार रुपयांत गाडीचा सौदा ठरला होता. संबंधित व्यक्तीने स्वप्नील यांना विश्वास बसावा यासाठी ऑफिसचे फोटो टाकले होते. तसेच त्यांना अॅडवान्समध्ये 5 हजार रुपये गुगल पेच्या माध्यमातून आपल्या खात्यावर भरावयास सांगितले.

स्वप्निल यांनी त्यानुसार रकम भरली. मात्र, नंतरही वेगवेगळी कारणे देत 79 हजार 526 रुपये भरावयास लावले. मात्र, त्यानंतरही स्वप्निल याला गाडी न मिळाल्याने त्याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.  याप्रकरणी पोलिसांनी एका मोबाईल धारक, गुगल पे अकाउंटधारक आणि डिलेव्हरी बॉय अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.