Pune:पुणे शहराच्या पाणी कपाती विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आंदोलन

 एमपीसी न्यूज: पुणे शहराला मागील आठवडाभर पासून प्राधिकरणाच्या निर्णयामुळे पुणेकर नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज पाणी कपातीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले की, पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर झाला असून यावर सत्ताधारी भाजप गंभीर नसल्याचे प्राधिकरण च्या निर्णय नंतर दिसून येत आहे. या पाणी कपाती बाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन भाजप करताना दिसत नाही. पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी लवकर निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र लढा उभारला जाणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.