Pune-  घरफोडी करून ऑफिसमधील 5 लाख केले लंपास

एमपीसी न्यूज – घरफोडी करून 5 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी(दि.18) सायंकाळी पावणे सात ते बुधवारी(दि.19) सकाळी आठ च्या दरम्यान शंकरशेठ रोडवरील एस.आर.सी केमिकल प्रायव्हेट लिमीटेड या ऑफिसमध्ये घडली.

याप्रकरणी सजि जोसेफ (वय 47, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शंकरशेठ रोडवरील एस.आर.सी केमिकल प्रायव्हेट लिमीटेड या ऑफिसच्या पॅन्ट्री मधील खोलीच्या स्लाईडिंगच्या खिडकीवाटे एका अज्ञात इसमाने ऑफिसमध्ये प्रवेश केला. दरम्यान त्या चोरट्याने ऑफिस मधील लाकडी टेबलच्या ड्रॉवरचे लॉक उचकटले आणि ड्रॉवरमधील तब्बल 5 लाख 14 हजार 800 रूपयांची रोकड चोरून नेली.
याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.