Bhosari : भोसरीत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या शिबिरात 329 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोनच्या वतीने भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवनात गुरुवारी ( दि.20 ) सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी आणि औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी 629 युनिट रक्त संकलन केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. या शिबिरास माजी आमदार विलास लांडे , डॉ. प्रभाकर तावरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

संत निरंकारी मंडळामध्ये रक्तदानाची सुरवात 1986 पासून झाली, एप्रिल 2018 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 16 रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत या मध्ये 5346 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे, मार्च 2019 पर्यंत उर्वरित 6 शिबीर संपन्न होणार असून साधारणतः 9000 युनिट रक्त संकलित होईल अशी माहिती फाऊंडेशन च्या माध्यमातून देण्यात आली.

तसेच सायंकाळीपर्यंत सर्व संतांनी आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचा आनंद घेतला. संत निरंकारी मंडळाचे भोसरी सेक्टरचे संयोजक अंगद जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले . हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यास सेवादल , चॅरिटेबलच्या सर्व स्वयंसेवकांचे योगदान लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.