Kalewadi : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त उद्या धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज- राष्टसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 50 व्या पुण्यतिथी उत्सव उदया रविवारी (दि. 23) साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काळेवाडी येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ वाजता काळेवाडी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहे. त्यानंतर हभप भागवत महाराज साळुंखे यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना हभप पंढरीनाथ आरु, हभप महेश भगुरे, हभप चंद्रकांत पांचाळ आदी साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमासाठी आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री उल्हास पवार, उपमहापौर सचिन चिंचवडे, हभप विठ्ठल काळोळे, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड.विकास ढगे, देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पंढरीनाथ मोरे महाराज, विदर्भ सहयोग मंडळाचे कार्याध्यक्ष ड़ॉ.दिगंबर इंगोले, एस. एन. पठाण, कैलास बवले, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख विश्वस्त कविता भोंगाळे. उद्योजक विनायक भोंगाळे, शब्दब्रम्ह संस्थेचे संस्थापक प्रभाकर चव्हाण, उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.