_MPC_DIR_MPU_III

Pimple Saudagar : सी.एम.चषक अंतर्गत चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील लिनीअर अर्बन गार्डन (गोविंद चौक) येथे रविवार ( दि. 23 ) रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सी. एम. चषक अंतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधे 150 ते 200 मुलांनी आपला सहभाग नोंदवला.

_MPC_DIR_MPU_IV

या स्पर्धेचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ काटे, संजय कुटे, कैलास कुंजीर, किरण केसवड, सुप्रिया पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

स्पर्धेमध्ये लहान मुलांसोबत पालकांनी देखील आपला सहभाग नोंदवला. यावेळी मुलांनी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’, स्त्री भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, निसर्गचित्र या समाजजागृती करणाऱ्या विषयांवर चित्र रेखाटन केले.

नियोजकांकडुन मुलांना चित्रकला उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. अतिशय उत्साही वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.