Kothrud : रस्ता ओलांडणा-या चिमुकल्यांना दुचाकीची धडक; दोघी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणा-या दोन चिमुकल्यांना दुचाकीने दिलेला धडकेत त्या गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.22) दुपारी चारच्या दरम्यान पौडरोड येथील दुर्गा कॅफे हॉटेल समोरील रोडवर घडली आहे.

मेहक मनेर (वय 10) आणि आयरा मनेर (वय 6) असे अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.याप्रकरणी मुलींच्या आईने सोनल मनेर(वय 38,रा.पाषाण रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनल या त्यांच्या लहान मुलीना घेऊन रस्ता क्रॉस करत होत्या.दरम्यान एका अनोळखी दुचाकीस्वाराने भरधाव वेगात मोटारसायकल चालवून रस्ता क्रॉस करणाऱ्या मेहक आणि आयरा या दोघींना धडक दिली. या अपघातात त्या दोघीही डोक्याला आणि खांद्याला मार लागल्याने गंभीररीत्या जखमी झाल्या. परंतु तो दुचाकीस्वार अपघाताच्या ठिकाणी न थांबता तेथून पसार झाला . अपघातातील मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .तर याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोथरुड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.