Pimpri : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही घटना खराळवाडी पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पतीसह अन्य सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आरोपी पतीसोबत 2 फेब्रुवारी 2010 रोजी विवाह झाला. विवाहानंतर सहा महिन्यांनी सासरच्या मंडळींनी फिर्यादी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तसेच तिच्याकडे माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच वेगवेगळ्या कारणावरून फिर्यादी महिलेला जेवण दिले नाही. घटस्फोट देण्याची मागणी करत देखील त्रास देण्यात आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.