Talegaon Dabhade : सौरभ खळदे यांना युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन येथून एम.बी.ए ची पदवी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट ऍन या इंग्रजी माध्यमातील शाळेचा माजी विद्यार्थी सौरभ सतीश खळदे यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन येथून एम.बी.ए ची पदवी विशेष श्रेणीत संपादन केली आहे. या यशाबद्दल खळदे यांचे तळेगाव शहर परिसरात कौतुक होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

सौरभ खळदे यांना एम.बी.ए या अभ्यासक्रमासाठी लंडन येथील युनिव्हर्सिटीच्या वतीने पाच हजार पौंड शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी’ डॉक्टर इन बिझनेस मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजी ‘ हा पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला असून पदवीदान समारंभांनंतर ते नुकतेच मायदेशी परतले आहेत. या यशाबद्दल खळदे यांचे तळेगाव शहर परिसरात कौतुक होत आहे.
सौरभ खळदे हे अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे उपाध्यक्ष सतीश खळदे यांचे चिरंजीव असून तळेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांचे पुतणे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.