Vadgaon Maval : मावळ क्रिकेट लीग टी 20 ; प्रशांत वहिले क्लब व सेंन्ट्रल रेल्वे संघ विजयी

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लब आयोजित पुणे जिल्हास्तरीय मावळ क्रिकेट लीग टी 20 स्पर्धेतील साखळी सामन्यामध्ये प्रशांत वहिले क्लब, लोणावळा सीसी, देहू इलेव्हन, सेंन्ट्रल रेल्वे या संघानी विजय प्राप्त केला.

परंदवाडी येथील वेदांत स्टेडियमवर ही स्पर्धा सुरु आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात सेंन्ट्रल रेल्वे संघात महाराष्ट्र रणजी खेळाडू माजी कर्णधार निखिल पराडकर व महाराष्ट्र रणजी व आय पी एल सनराईज हैदराबादचे माजी खेळाडू पराग मोरे यांनी रेल्वे संघात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. तसेच प्रशांत वहिले क्रिकेट क्लबचे कर्णधार शैलेश वहिले यांनी 4 विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.

फलंदाजीमध्ये प्रतीक भाटीया यांनी 20 चेंडूत 48 धावा केल्या तर अमोल ठोंबरे यांनी 39 धावा केल्या. मंगळवारी झालेल्या सर्व साखळी सामन्यातले मॅन आॅफ द मॅच हा किताब मिळवणारे खेळाडू पुढीलप्रमाणे – 1) निखिल पराडकर , 2) शैलेश वहिले, 3) राजु शेख, 4) राहुल असबे

संक्षिप्त धावफलक :

प्रशांत वहिले क्रिकेट क्लब 20 षटकात 7 बाद 163 ( प्रतीक भाटीया -48 , अमोल ठोंबरे – 39,पज्जी -17, निलेश ढगे -1/17, अजित-2/30,अमोल केदारी -2/27) विजयी वि पराभूत स्पार्टन 19.1 षटकात सर्व बाद 136 ( निलेश ढग-38, विशाल -21, शैलेश वहिले – 4/24, पज्जी -2/26 आशिष मोहीले 2/6)

देहू इलेव्हन 17 षटकात 6 बाद 139 ( प्रसाद -45, सारंग -21, प्रविण काळोखे -20, मोहन -३/१३ , अतुल 2/21, ) विजयी वि पराभूत आनंद येवले क्लब : 9 षटकात 9 बाद 64 ( प्रदीप -१४, अतुल – 14 , राहुल-3/7, रवी -2/19, प्रवीण काळोखे 1/11)

लोणावळा सीसी 20 षटकात 9 बाद 173 ( शानु -42, सुधीर शेलार -45, सप्पन -20, अमित पंडीत- 3/28, आशिष -3/27, हर्ष-2/21 ) विजयी वि पराभूत शिरुर क्लब : 20 षटकात 6 बाद 139 ( स्वप्निल -51, संकेत – 36,करण – 23, राजु शेख -4/28, किरण -1/6, सप्पन – 1/21)

राऊत क्लब : 13 षटकात सर्वबाद 64 ( राहुल -17 , पराग मोरे -3/11,निखिल पराडकर -2/10, सारज -२/०) – पराभूत वि पराभूत सेंट्रल रेल्वे 8 षटकात 2 बाद 65 ( देवदत्त -43, युवराज गोळे -11,देवेंद्र -1/26, रियांशु 1/13.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.