Pune – महिलेचे पावणे दोन लाखांचे मंगळसुत्र चोरट्यांनी नेले हिसकावून

एमपीसी न्यूज – दूचाकीवरून जाणा-या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल पावणे दोन लाखांचे मंगळसुत्र दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना काल मंगळवारी (दि.25) आठच्या सुमारास बाणेर रोड वरील युनियन बॅंकेपुढे घडली.याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मुलीसह बाणेर येथून त्यांच्या दुचाकीवर धनुकडे वस्तीच्या मार्गाने त्यांच्या घरी जात होत्या.दरम्यान पाठीमागून दूचाकीवर दोघेजण आले आणि त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे पावणे 2 लाखांचे मंगळसुत्र जोरदार हिसका मारून चोरून नेले.याप्रकरणी दोन अज्ञात दूचाकीस्वारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:श्रुंगी पोलीस करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.