Chinchwad : अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम 

एमपीसी न्यूज – माजी पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंती निमित्त नगरसेवक मोरेश्वर शेडगे सोशल फाऊंडेशनच्या वतीने सुशासन दिन साजरा करण्यात आला. तसेच चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना ब्लँकेट्‌स आणि खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्म जागरण विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख हेमंत हरहरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप नेत्या प्रतिभा लोखंडे, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विश्राम देव, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कांता मोंढे, भीमा बोबडे, विजय शिनकर, पुनम गुजर,  प्रा. जगन्नाथ देविकर, गोपाळ कळमकर, रविंद्र प्रभुणे, अजित कुलथे, धनंजय शाळिग्राम, मधुकर बच्चे, राघू चिंचवडे, राजन पाटील, स्वप्निल गावडे, सतीश अवचार, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, सतिश अवचार, मारुती वाघमारे आदी उपस्थित होते.

” अटलींच्या राष्ट्रभक्ती पर कवीतांनी कार्यकर्ते प्रभावित होऊन पक्ष संघटनेचे काम हे देशकार्यच आहे असे मानून निष्ठेने कार्य करीत असत. अटलजी पंतप्रधान झाल्यानंतरच या देशात खर्या अर्थाने सुशासन सुरु झाले म्हणूनच आजचा दिवस हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. अशा अजातशत्रू अटलजींचा संघर्षमय राजकिय व सांस्कृतीक जीवनकार्याची माहिती पक्षाच्या नविन युवा कार्यकर्त्यांना माहित असली पाहीजे. ती त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य नगरसेवक शेडगे गेली अनेक वर्षांपासून करित आहेत”, असे खासदार अमर साबळे म्हणाले.

साबळे व सदाशिव खाडे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदाशिव खाडे यांचा क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर शेडगे यांनी केले. नंदू भोगले यांनी सूत्रसंचालन केले. तर, तुकाराम चौधरी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.