Vadgaon Maval : प्रशांत वहिले क्लब व सेंन्ट्रल रेल्वे, संघ उपांत्य फेरीत दाखल

मावळ क्रिकेट लीग टी 20 क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज- प्रशांत वहिले प्रतिष्ठान व क्रिकेट क्लब आयोजित पुणे जिल्हा स्तरीय मावळ क्रिकेट लीग टी 20 स्पर्धेत प्रशांत वहिले क्लब व सेंन्ट्रल रेल्वे, संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. परंदवाडी येथील वेदांत स्टेडियमवर ही स्पर्धा सुरु आहे.

साखळी सामन्यांमध्ये प्रशांत वहिले क्लब, लोणावळा सीसी, देहू इलेव्हन, सेंन्ट्रल रेल्वे हे संघ विजयी झाले. आज प्रशांत वहिले क्लब व सेंन्ट्रल रेल्वे यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळवला गेला. या सामन्यात सेन्ट्रल रेल्वे संघाचा खेळाडू निखिल पराडकर व आय पी एल सनराईज हैदराबादचे खेळाडू पराग मोरे यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले.

प्रशांत वहिले क्रिकेट क्लबचे कर्णधार शैलेश वहिले यांनी 4 विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला व फलंदाजीमध्ये प्रतीक भाटीया यांनी 20 चेंडूत 48 धावा करत व अमोल ठोंबरे यांनी 39 धावा केल्या. आज झालेल्या सर्व साखळी सामन्यातले मानकरी मॅन ऑफ द मॅच हा किताब निखिल पराडकर, शैलेश वहिले, राजु शेख, राहुल असबे यांना देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक :

प्रशांत वहिले क्रिकेट क्लब 20 षटकात 7 बाद 163 ( प्रतीक भाटीया -48 , अमोल ठोंबरे – 39,पज्जी -17, निलेश ढगे -1/17, अजित-2/30, अमोल केदारी -2/27) विजयी वि पराभूत स्पार्टन 19.1 षटकात सर्व बाद 136( निलेश ढग-38, विशाल -21, शैलेश वहिले – 4/24, पज्जी -2/26आशिष मोहीले 2/6)

देहू इलेव्हन 17 षटकात 6 बाद 139 ( प्रसाद -45, सारंग -21, प्रवीण काळोखे -20, मोहन -3/13 , अतुल 2/21 ) विजयी वि पराभूत आनंद येवले क्लब : 9 षटकात 9 बाद 64 ( प्रदीप -14, अतुल – 14, राहुल-3/7, रवी -2/19, प्रवीण काळोखे 1/11)

लोणावळा सीसी 20 षटकात 9 बाद 173 ( शानु -42, सुधीर शेलार -45, सप्पन -20, अमित पंडीत- 3/28, आशिष -3/27, हर्ष-2/21. ) विजयी वि पराभूत शिरुर क्लब : 20 षटकात 6 बाद 139 ( स्वप्निल -51, संकेत – 36,करण – 23, राजु शेख -4/28, किरण -1/6, सप्पन – 1/21)

राऊत क्लब : 13 षटकात सर्वबाद 64 ( राहुल -17 , पराग मोरे -3/11, निखिल पराडकर -2/10, सारज -2/0) – पराभूत वि पराभूत सेंट्रल रेल्वे 8 षटकात 2बाद 65 ( देवदत्त -43, युवराज गोळे -11, देवेंद्र -1/26, रियांशु 1/13)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.