Mulshi : मुळशीच्या तहसीलदारास 1 कोटींची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज – 1 कोटीची लाच स्वीकारणाऱ्या मुळशीच्या तहसीलदारास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि 29) उरवडे गावाच्या हद्दीत, लवासा रोडवर रंगेहात पकडले आहे. सचीन महादेव डोंगरे (वय 43, रा.बावधन) असे लाच स्वीकारणाऱ्या तहसीलदाराचे नाव आहे.याप्रकरणी एका 63 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वारस नोंदीचे प्रकरण मंत्रालयातून फेरचौकशीसाठी तहसीलदार सचीन डोंगरे यांच्याकडे आले होते. या प्रकरणाचे निकालपत्र देण्यासाठी आणि त्याची सात बाराच्या उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी सचीन डोंगरे यांनी तक्रारदार यांना एक कोटींची लाच मागितली होती.याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार नोंदवली या तक्रारीची तपासणी करून शनिवारी लवासा रोड येथे तहसीलदार सचीन डोंगरे यास 1 कोटींची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

या कारवाईदरम्यान 15 लाखांच्या खऱ्या नोटा वापरण्यात आल्या तर उर्वरित नोटा या खोट्या होत्या. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाची 2018 मधील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.