Pune : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. नववर्ष स्वागतासाठी शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक विभागाने शहराच्या काही भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

पुणे शहरातील वाहतुकीत केलेले बदल पुढीलप्रमाणे असतील-

– नो व्हेइकल झोन ( 31 डिसेंबर सायंकाळी 6 ते 1 जानेवारी पहाटे 5 पर्यंत)

1) फर्ग्युसन रस्ता( एफ.सी रोड)- गुडलक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत

2) महात्मा गांधी रस्ता (एम.जी.रोड) – हॉटेल अरोरा टॉवर चौक ते पुलगेट पोलीस चौकी)

वाहतूक वळविण्यात आलेले काही मुख्य रस्ते

_MPC_DIR_MPU_II

1) लष्कर परिसर :

# वाय जंक्शन – खाण्या मारुती चौकाकडून येणारी वाहतूक ईस्ट स्ट्रीट रस्त्याने व्होल्गा चौकाकडे जाईल. व्होल्गा चौकातून प्रीत मंदिर चौक व इंदिरा गांधी चौकातून पुढे.
# लष्कर पोलीस ठाणे चौक – इंदिरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलीस ठाणे येथून तीन तोफ चौकाकडे.
# तीन तोफ चौक – उजवीकडे वळून एसबीआय हाऊसकडे.
# यामाहा शोरूम – कुरेशी मशिदकडून 15 ऑगस्ट चौकातील वाहतूक सुजाता मस्तानी लेनमार्गे पुढे बिशप सर्कल – मम्मादेवी चौकातून येणारी वाहतूक बिशप सर्कल येथून गुरुद्वारा रस्त्याने एसबीआय हाऊसकडे जाईल.

2) हडपसर परिसर – ( 31 डिसेंबर सायंकाळी 7 ते 1 जानेवारी रात्री 1 पर्यंत)

# अमनोरा कडून जाणारी वाहने डावीकडे वळून पुढे जातील तसेच खराडीकडे जाणारी वाहने मगरपट्टा मेनगेटने पुढे जातील
# सीजन मॉल समोरील रस्त्यावरून मगरपट्टा रस्त्यावर जाता येणार नाही. मगरपट्टाकडे जाणाऱ्या वाहनांना रेल्वे पुलाखालून यू टर्न घेऊन पुढे जावे.
# खराडीकडे जाणाऱ्या वाहनांनी नोबेल हॉस्पिटलकडे वळून मगरपट्टामागील रस्त्याने हडपसर रेल्वे पुलावरून पुढे जावे.

3) येरवडा परिसर (31 डिसेंबर रात्री 9 ते 1 जानेवारी रात्री 12 पर्यन्त)

# पुणे व पिंपरी चिंचवडमधून नगर रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या सर्व वाहनांना 31 डिसेंबर रात्री 9 पासून ते 1 जानेवारी रात्री 12 पर्यंत या रस्त्यावरून जाता येणार नाही.

तसेच 1 जानेवारी पहाटे 5 पर्यंत पुणे शहरातील सर्व महत्वाच्या चौकांमधील सिग्नल सुरू राहतील. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.