Vadgaon Maval : रक्तदान शिबिरात 80 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज- स्व.सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्ट, जैन सकल संघ वडगांव मावळ आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिवंगत सुषमा सुनील बाफना यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त जैन स्थानक वडगांव येथे भव्य रक्तदान शिबिर झाले. ८० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले ज्यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते व नगरसेवक प्रवीण चव्हाण यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले. रक्तदान शिबिराला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 80 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले ज्यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.

रक्तदात्यांमध्ये नगरसेवक सुनील ढोरे,गटनेते दिनेश ढोरे, उपसरपंच अविनाश चव्हाण, प्रवीण ढोरे, यूनियन बँक शाखा व्यवस्थापक रवींद्र पलडीया, वैशाली म्हाळसकर, सुदाम बुचडे , मोहन पवार , क्रीडापटू जुई जांभुळकर यांचा समावेश होता.

मयूर ढोरे यांनी रक्तदान शिबिरास शुभेच्छा देतांना अशी शिबिरे सदैव होत राहावीत जेणेकरून गरजू रुग्णांना यांचा फायदा होईल असे मत व्यक्त केले आणि या शिबिराच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. सागर कर्णावट यांचे हे 39 वे तर अंकित बाफना यांचे 37 वे रक्तदान होते

लायन्स क्लबचे अध्यक्ष सुनीत कदम, संस्थापक दामोदर भंडारी, बाळासाहेब बोरावके, आदिनाथ ढमाले, संतोष चेट्टी, जितेंद्र रावल, अमोल मुथा, संजय भंडारी, अंकित बाफना, योगेश भंडारी, संजय गांधी तसेच जैन सकल संघाच्या वतीने प्रदीप बाफना, भूषण मुथा, झुंबरलाल कर्णावट, दिलीप मुथा, डॉ. सुनील बाफना, मनोज बाफना, नितिन बाफना, हर्षल बाफना, चेतन बाफना, आदेश बाफना, नवीन बाफना, सुनीता बाफना, अनिता बाफना, रक्षा बाफना, स्नेहल बाफना यांनी नियोजन केले. गरवारे ब्लड बँकेमार्फत रक्त संकलन करण्यात आले आणि रक्तदात्यास सवलत कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.