Pune : महिलेच्या गळ्यातील दोन लाखांचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला मुलीशी बोलत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे गंठण दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास कोथरूड येथील मंगलमूर्ती गार्डन सोसायटीच्या समोरीलर स्त्यावर घडली.

याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोसायटी समोरील रस्त्यावर त्यांच्या मुलीशी बोलत उभ्या होत्या. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील दोन लाखांचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.